ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना करिअर च्या असंख्य वाटा माहित व्हाव्यात व भविष्यात या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण होऊन त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे याची गरज ओळखून अहमदनगर जिल्ह्यातील विद्येचे माहेरघर असलेले लोणी (प्रवरा) येथे विद्यानिकेतन करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ' लातूर पॅटर्न ' ची सुरुवात 03 मार्च 2006 रोजी केली. ' लातूर पॅटर्न ' च्या माध्यमातून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना 11 वी 12 वी सायन्स च्या विविध विषयांच्या तयारी वर्गासह अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील इंजिनीरिंग,फार्मसी,मेडिकल, ऍग्रीकल्चर प्रवेश परीक्षांचे तयारी वर्ग आम्ही सुरु केले. आजपर्यंत जवळजवळ 4000 विद्यार्थी या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. आमच्या या उपक्रमाची सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण व वेगळी विशेषतः म्हणजे विद्यार्थ्याला त्याचे करिअर कोर्स मिळेपर्यंत मार्गदर्शन. १२ वी NEET / MHT-CET /JEE या परीक्षांच्या निकालानंतर हुशार विद्यार्थी तर चांगल्या कॉलेज मध्ये चांगल्या कोर्स ला निवडला जातोच परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय ? याच प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना आमच्याकडून मिळते. अगदी शेवटच्या विद्यार्थ्याला त्याचे मनपसंत करिअर कोर्स मिळेपर्यंत आम्ही त्यास मार्गदर्शन सेवा देतो. हेच इतरांपेक्षा आमचे वेगळे वैशिष्ट्य आहे. तसेच सामाजिक भान असलेले उच्च विभूषित व तज्ज्ञ प्राध्यापक हि एक आमची जमेची बाजू आहे. या सर्व वैशिष्ट्यांसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवनवीन वाटा माहित व्हाव्यात यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील व आशावादी आहोत . 

--------------------------------------------------------------------------------------------------Prof. Vijay Bhosale 

  • Enroll Yourself

    Learn online with best education Expert for your Educational needs which starts from 8th std. to 12th std. for Foundation Batches.

  • Crash Course for NEET/ JEE/ MHT-CET

    Get complete Crash course for all Your educational needs from preparations for NEET/ JEE/ MHT-CET online classes, test series, results, performance tracker, doubts & discussions etc.

  • Career Guidance

    Get complete guidance for your Career choice selection and helps to get admission secured to best educational institutes in India.